शिवराय हे धर्मनिरपेक्षतेचे नायकच नव्हे , तर महानायक होते. आज ते सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक बनायला हवे होते.पण , त्यांच्या राजवटीला धामिर्क परिमाण देऊन त्यांना ' मुस्लिमविरोधी हिंदूधर्मरक्षक ' बनवले जात आहे.आज देश कधी नव्हे एवढ्या धर्मचक्रव्यूहात सापडला आहे. धर्माच्या नावाने मत्सरभावना वाढीस लावल्या जात आहे. राजकीय सत्तेसाठी धूर्त मंडळी धर्माचा वापर करून दंगली करताहेत. आणि हे करताना ' शिवाजी महाराज की जय ' म्हणून घरांना आगी लावतात हे फारच क्लेशकारक आहे. शिवरायांला कट्टर धर्मश्ाद्ध ठरवून , त्यांच्या विचाराची मोडतोड करून समाजात विष पेरण्यात धूर्त मंडळी यशस्वी होत आहेत. शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्षतेचे नायकच नव्हे , तर महानायक होते. त्यांच्या राजवटीला धामिर्क परिमाण दिले जात आहे. ते मुस्लिमविरोधी व हिंदूधर्मरक्षक होते , असे सांगण्यात येत आहे.
पण , शिवराय कधीही मुस्लिमविरोधी नव्हते. त्यांच्या पदरी , तेही मोठमोठ्या हुद्द्यांवर अनेक मुसलमान सरदार , वतनदार होते. त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान होता , आरमाराचा प्रमुख दर्यासारंग दौलत खान होता , अंगरक्षक मुसलमान होता , तर अफझलखानाचा अंगरक्षक व वकील कृष्णाजी भास्कर कुलकणीर् होता. याचा भावार्थ असा की , त्यावेळी समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी नव्हती. जे शिवरायांचे मुस्लिम सैन्य होते ते मोगलांविरुद्ध लढे , तर मुसलमान राज्याच्या पदरी असलेले हिंदू सैनिक शिवरायांविरुद्ध लढत.
इतिहासकार काफी खान म्हणतात की , शिवराय आपल्या सैनिकांना मशीद , कुराण व बायबल यांचा कधीही अपमान करू देत नसे. स्वारीवर असताना बायबल किंवा कुराण आढळले तर ते मोठ्या आदरपूर्वक जवळ घेत व सैन्यात मुस्लिम व ख्रिश्चनांना नोकरी देत असत. फ्रेंच प्रवासी बनीर्यर याने म्हटले आहे की , शिवरायांनी कांपुचियन मिशनरी फादर अब्रोस याच्या घराचे व इतर वस्तूंचे मोठ्या आदराने रक्षण केले. शिवाजी महाराजांनी म्हटले होते की , फेंच पादरी ही चांगली माणसे असतात , त्यांना उपसर्ग होता कामा नये. परंतु , आज त्यांच्या नावाचा उद्घोष करणारे ख्रिश्चन मिशनऱ्यांवर हल्ले करतात , नन्सवर बलात्कार करतात. महाराजांच्या गुरूंपैकी संत याकूब बाबा हे मुस्लिम संतही होते. हे पाहता , खरेतर आज शिवराय सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक बनायला हवे होते. पण , त्यांना हिंदुत्ववाद्याच्या हातातील मुस्लिमविरोधी अमोघ हत्याराची अवकळा आणली जात आहे. मुस्लिम धर्माविरुद्ध आपली मते प्रस्थापित करण्यासाठी जे महाराजांच्या नावाचा वापर करतात , त्यांना सामान्य लोकांनी सुनावले पाहिजे की , शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेत राजा म्हणून कधीही धर्मावरून भेद केला नाही. आपल्या धर्माइतकाच दुसऱ्याचा धर्मही श्ाेष्ठ व उच्च आहे असे त्यांचे मत होते.
शिवराय इतर मराठा सरदारांप्रमाणे मोगल सेनेचे मांडलिक बनले नाहीत. ते परकीय सत्तेच्या विरोधात संघर्षरत राहिले. वारसा हक्काने ते राजा बनले नव्हते , तर बुद्धीच्या व तलवारीच्या जोरावर राज्य स्थापन केले होते. ते शूर लढवय्ये व कुशल संघटक होते.
पण आज शिवरायांबद्दल काही संघटना खोटा इतिहास लोकांना सांगत आहेत. शिवरायांच्या प्रखर बुद्धीला व पराक्रमाला ते नाकारत आहेत. दांभिक माणसे शिवाजीच्या यशाचे श्ाेय अध्यात्म व भवानीदेवीला देत आहेत. शिवाजी महाराजांना भवानी प्रसन्न झाली , म्हणून ते यशस्वी झाले , असे भोळ्याभाबड्या लोकांना सांगण्यात येत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की , भवानी तलवार म्हणून जिचा गाजावाजा करतात ती तलवार पोर्तुगीज बनावटीची होती.
सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याच्या महाराजांच्या प्रयत्नांना ब्राह्माण कारकुनांचा विरोध असे. राज्याभिषेका-नंतर शिवरायांनी सामाजिक सुधारणांना गती दिली होती , पण , त्यांनाही ब्राह्माणांकडून विरोध झाला. तेव्हा महाराजांनी ' ब्राह्माण म्हणोनी कोणाचा मुलहीजा करणार नाही ' अशी सक्त ताकीद दिली होती.
हिंदूधर्मरक्षक म्हणून शिवाजीला मिरवणाऱ्या मतलबी लोकांनी विसरू नये की , याच हिंदू धर्माने व त्याच्या रक्षकांनी शिवाजीच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. 44 व्या वषीर् मुंज व एकदा झालेला विवाह दुसऱ्यांदा करावयास लावला होता. महाराजांना वठणीवर आणण्यासाठी औरंगजेबाने जयसिंगास महाराष्ट्रात पाठविले होते. शिवाजीवर विजय कसा मिळवावा या चिंतेत तो असताना इथल्या ब्राह्माणांनी त्यासाठी देवीप्रयोगी अनुष्ठाने व कोटचंडी यज्ञ करण्याचा सल्ला दिला होता. एकीकडे शिवराय मोगल साम्राज्यशाहीची मृत्युघंटा वाजवीत होते , तर दुसरीकडे महाराष्ट्रातील भिक्षुकशाही मात्र धामिर्क प्रतिक्रांतीद्वारे मोगल साम्राज्यशाहीचे मरण लांबणीवर टाकत होती.
शिवरायांच्या संघर्षकाळात त्यांचे सर्व सैनिक मावळे होते. त्यांत आदिवासी , कुणबी , अस्पृश्य व मुस्लिम होते. या सर्व मावळ्यांना शिवाजीने ' मराठा ' बनविले , असे ग्रँट डफ यांच्या ग्रंथात नमूद केले आहे. शिवरायांनी स्त्रियांचा मान राखला होता. शिवाजीच्या काळी गोरगरीबांच्या लेकी-सुना या पाटील-वतनदाराच्या उपभोगवस्तू होत्या. पण शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन फार वेगळा होता. 1678 साली सकुजी गायकवाड या सेनापतीने सावित्रीबाई देसाई या किल्लेदार बाईस हरवून विजयाच्या उन्मादात तिच्यावर बलात्कार केला. हे शिवरायांना समजले , तेव्ह त्यांनी सकुजी गायकवाडचे डोळे काढावयास लावून जन्मभर तुरुंगात टाकले.
एकदा राज्याच्या पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या मुलीला सर्वांसमक्ष उचलून नेली व उपभोगली , तेव्हा शरमेने तिने जीव दिला. महाराजांनी पाटलाला मुसक्या लावून पुण्यात आणले गेले व त्याचे हातपाय तोडले. रयतेच्या अब्रूचे रक्षण करणाऱ्या शिवाजीचा आदर्श त्याचे उठसूठ नाव घेणारे पाळतात काय ? अत्याचाऱ्यास शिक्षा होते काय ?
तथाकथित शिवभक्त व कट्टर हिंदुत्ववादी शिवाजीचा हा आदर्श पाळून त्यांच्या डोक्यावर मानाचा तुरा लावतील काय ?

Comments