Skip to main content

Posts

Showing posts with the label खडे बोल...

शिवरायांचा आठवावा साक्षेप

शिवराय हे धर्मनिरपेक्षतेचे नायकच नव्हे , तर महानायक होते. आज ते सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक बनायला हवे होते.पण , त्यांच्या राजवटीला धामिर्क परिमाण देऊन त्यांना ' मुस्लिमविरोधी हिंदूधर्मरक्षक ' बनवले जात आहे.आज देश कधी नव्हे एवढ्या धर्मचक्रव्यूहात सापडला आहे. धर्माच्या नावाने मत्सरभावना वाढीस लावल्या जात आहे. राजकीय सत्तेसाठी धूर्त मंडळी धर्माचा वापर करून दंगली करताहेत. आणि हे करताना ' शिवाजी महाराज की जय ' म्हणून घरांना आगी लावतात हे फारच क्लेशकारक आहे. शिवरायांला कट्टर धर्मश्ाद्ध ठरवून , त्यांच्या विचाराची मोडतोड करून समाजात विष पेरण्यात धूर्त मंडळी यशस्वी होत आहेत. शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्षतेचे नायकच नव्हे , तर महानायक होते. त्यांच्या राजवटीला धामिर्क परिमाण दिले जात आहे. ते मुस्लिमविरोधी व हिंदूधर्मरक्षक होते , असे सांगण्यात येत आहे. पण , शिवराय कधीही मुस्लिमविरोधी नव्हते. त्यांच्या पदरी , तेही मोठमोठ्या हुद्द्यांवर अनेक मुसलमान सरदार , वतनदार होते. त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान होता , आरमाराचा प्रमुख दर्यासारंग दौलत खान होता , अंग...

आठवावा प्रताप !

शिवाजी महाराजांच्या मुंबईच्या समुद्रातील स्मारकावर महाराष्ट्रात बरंच वादळ घोंगावतयं. पण या स्मारकावरुन होणारा गोंधळ काही नवीन नाही. आणिकही धर्मकृत्ये चालती। आश्रित होउनि कितेक असती। धन्य धन्य तुमची कीर्ति। विश्वी विस्तारली।। समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सतराव्या शतकात केलेले हे वर्णन. काळाच्या ओघात संदर्भ बदलल्याने अनेक वर्णने अर्थहीन बनतात. परंतु ' आश्रित होउनि कितेक असती ' हे वर्णन मात्र चारशे वर्षांनंतरही कित्येकांस लागू पडते. अशा मानसिकदृष्ट्या आश्रित असलेल्या आमदारांनी गुरुवारी विधान परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक करण्याच्या प्रश्ानवरून गदारोळ घातला व अखेर कमजोर सरकारकडून आश्वासनही मिळवले. शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधी पक्षांनी आपापली दुकाने चालवण्यासाठी जितका केला , तितका अन्य कुणा राष्ट्रपुरुषाचा केला गेला नसेल. शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक करण्यासाठी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारच्या काळात एक समिती नेमण्यात आली. या समितीने 1999 मध्ये अहवाल सादर केला खरा , पण दरम्यान युतीची सत...

Raje tumhi rakta sandle

महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला?

रणजीत देसाई यांच्या ‘ श्रीमान योगी ’ या पुस्तकाची नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेली प्रस्तावना ही शिवचरित ्राचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. याच प्रस्तावनेत कुरुंदकरांनी महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला ते सांगितले आहे. तो भाग या प्रस्तावनेतून जसाच्या तसा... ................................... इ. स. १६७४ ला शिवाजीने स्वतःला राज्याभिषेक करण्यासाठी हजार प्रयत्न करून, आपले क्षत्रियत्व त्याने सिद्ध केले. मुंज केली. प्रायश्चित्तं घेतली. स्वतःच्या पत्निंशीच नव्याने लग्ने केली. अभिषेकाचा इतका खटाटोप शिवाजीने का केला असा एक प्रश्न आहे. बेंद्रे यांचे म्हणणे असे की, ब्राह्मण गुन्हेगारांना शासन करणे, धार्मिक प्रश्नावर निकाल देणे हा अधिकार यावा म्हणून शिवाजीने राज्याभिषेक करून घेतला. माझे म्हणणे असे की, तो काळ धार्मिक प्रभाव आणइ वर्चस्वाचा काळ आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राज्याभिषेकाला पावित्र्य आणि प्रतिष्ठा आहे. राज म्हणजे मुसलमान, ही त्यावेळची समजूत आहे. दिल्लीपती हा सर्व भारताचा स्वयंभू सम्राट मानला जाई. यामुळे बहामनी घराणे वैभवात असतानाही जनतेला व खुद्द बहामनी वजीरांना आपल्या राज...

महाराजांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम सरदार होते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले. महराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ही ऐतिहासिक कामगिरी... सिद्दी हिलाल घोडदळातील सेनापती सहाय्यक पन्हाळगडाच्या वेढ्यात (२ मार्च १६६०) शिवरायांच्या सुटकेसाठी युद्ध केले. उमराणीजवळ बहलोल खानाशी लढून (१५ एप्रिल १६७३) त्याला शरण येण्यास भाग पाडले. सिद्दी वाहवाह (सिद्दी हिलालचा पुत्र) घोडदळातील सरदार सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत जखमी (२ मार्च १६६०) आणि कैद. सिद्दी इब्राहिम शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून त्याने कामगिरी (१९ नोव्हेंबर १६५९) चोख पार पाडली. सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला घेतला (एप्रिल १६७५) आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले. नूरखान बेग स्वराज्याचा पहिला सरनोबत २१ मार्च १६५७ रोजी स्वराज्याचा पहिला सरनोबत होण्याचा मान पटकावला. दिड लाखाच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कामगिरी चोख पार पाडली. मदारी मेहतर विश्वासू सेवक आग्रा येथील बंदीवासातून पळण्यासाठी (१७ ऑगस्ट १६६६) शिवरायां...

महाराष्ट्रात तीन शिवजयंती उत्सव का होतात?

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन वेगवेगळ्या दिवशी साज-या केल्या जातात. त्या का यांची माहिती... १.बखरकारांनी निर्देशित केलेली वैशाख शुद्ध पंचमी शके १५४९ ही शिवजन्मतिथी इतर पुरावे मिळेपर्यंत संशोधकांनी प्रमाण मानली होती. काही पुराणमतवादी नवीन जन्मतिथी पुराव्यांशी सहमत नाहीत. म्हणून ते लोक त्या तिथीला शिवजयंती उत्सव करतात. २.जेधे शकावलीनुसार फाल्गुन वद्य तृतिय शके १५५१ ही शिवजन्मतिथी बहुतांशी जुन्या नव्या संशोधकांना मान्य आहे. शिवकाळात इंग्रजी कालगणना हिंदुस्तानात प्रतलीत नव्हती. शिवराय हिंदूधर्माभिमानी होते. प्रभु रामचंद्र भगवान श्रीकृष्ण या सारख्या दैवतांत शिवरायांचे स्थान मानुन हिंदुधर्माभिमानी बहुतांशी या तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करतात. ३. सध्या हिंदुस्थानच्या सर्व सरकारी, नीम सरकारी, नागरी, आर्थिक, शैक्षणिक कारभार इंग्रजी कालगणनेनुसार चालतो. या देशांतील दिनदर्शिका इंग्रजी कालगणनेनुसार तयार केल्या जातात. ३७५ वर्षापूर्वी फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ ही हिंदु कालगणनेची शिवजन्म तिथी, इंग्रजी कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी आली होती. ती सरकारमान्...