Skip to main content

67.धाडसी कल्पकतेची झेप

महाराज गेल्या महिना सव्वा महिन्यात अगदी पद्धतशीर आणि काळजीपूर्वक आजारी होते. हे आजारपणाचं नाटक त्यांनी आणि त्यांच्यापेक्षाही त्यांच्या जवळच्या मावळी सौंगड्यांनी छान साजरं करीत आणलं होतं. वैद्य , हकीम , औषधं याची गरज होतीच ना! ती महाराजांपर्यंत पोहोचवण्याची परवानगी फुलादखानामार्फत आणि मराठी वकिलांमार्फत औरंगजेबाकडे जेव्हा जेव्हा मागितली गेली , तेव्हा तेव्हा ती मिळतही गेली. औरंगजेबाचं लक्ष होतं फक्त फिदाई हुसेनच्या हवेलीच्या बांधकामाकडे. ते बांधकाम पूर्ण होतच होतं.

याच काळात दक्षिणेत बीड-धारूर-फतहाबाद येथे असलेला मिर्झाराजा अतिशय चिंतेने व्याकुळ होता. कारण महाराजांना आग्ऱ्यास पाठवण्यामागे त्याचे जे विधायक राजकारण होते , ते औरंगजेबाने उधळून लावले होते. असा आपल्या मनात विचार येतो की , औरंगजेबाच्या ऐवजी येथे अकबर बादशाह असता , तर त्याने मिर्झाराजांच्या या राजकारणाचा किती वेगळा उपयोग करून घेतला असता ? पण औरंगजेबाचे राजकारण आणि अंत:करण उत्तमरितीने स्वार्थ साधणारेही नव्हते. त्याचे परिणाम त्याला आणि त्याच्या मोगल सल्तनतीला भोगावे लागले. अखेर मराठ्यांच्या हातूनच औरंगजेबही संपला आणि त्याची मोगल सल्तनतही संपली. खरं म्हणजे राजकारण म्हणजे एक योगसाधना असते. पण शकुनीमामा , दुयोर्धन , धनानंद , जयचंद आणि असे अनेक वेडे अदूरदशीर् प्राणी निर्माण झालेले आपण पाहतो. आजही पाहतो आहोत की ते पाहात असताना त्यांची फक्त ' न्युईसन्स व्हॅल्यू ' लक्षात येते. अन् पटतं की , काही लोकांचा तो धंदाच आहे. च्क्कश्ाद्यद्बह्लद्बष्ह्य द्बह्य ड्ड ड्ढह्वह्यद्बठ्ठद्गह्यह्य श्ाद्घ ह्यह्नह्वड्डठ्ठस्त्रह्मड्डद्यह्यज् त्यांचा शेवटही औरंगजेबी पद्धतीनेच होतो.

शुक्रवार दि. १७ ऑगस्टची दुपार म्हणजे औरंगजेबाच्या डोक्यात चाललेलं गहजबी तुफान होतं. तो वरून अगदी शांत होता.

महाराजांच्या डोक्यात आणि त्यांच्या सौंगड्यांच्या अंत:करणात यावेळी काय चाललं असेल ? न दिसू देता , कोणालाही संशयही न येऊ देता सारा डाव फत्ते करायचा होता. त्या त्या मराठी सौंगड्यांनी आपापली भूमिका किती सफाईने या रंगमंचावर पार पाडली असेल ? याचा विचार आज आमच्या आजच्या सामाजिक आणि राजकीय खेळांत आम्ही सूक्ष्मपणे करण्याची गरज आहे की नाही ? अहो , तालमी करूनही आम्हाला त्यातला अभिनयसुद्धा साधत नाही.

असू द्या! मिठाईचे येणारे पेटारे या शेवटच्या दिवशीही यायचे ते बिनचूक आले. ही वेळ संध्याकाळची , अंधारात चाललेली होती. हा सारा प्रसंग , हे सारे क्षण चिंतनानेच समजू शकतील. ज्या क्षणी महाराज पेटाऱ्यात शिरले , आणि तो पेटारा बंद झाला , तो क्षण केवढा चिंताग्रस्त होता. शामियान्यावरच्या मोगली पहारेकऱ्यांपैकी एखाद्याची नजर जर त्यावेळी त्या प्रसंगाकडे गेली असती , तर काय झालं असतं ? महाराजांच्या जागी चटकन पलंगावर शाल अंगावर घेऊन झोपणारा हिरोजी फर्जंद किती सफाईने वागला. पाहा! तो जरा चुकला असता तर ? पेटारे नेणारे वेषांतरीत मावळे गडबडले असते किंवा बावळटासारखे वागले असते तर ? हे सारेच प्रश्ान् अभ्यासकांपुढे येतात. त्याची उत्तरेही त्यांनाच शोधावी लागतात.

ही वेळ संध्याकाळची सात वाजायच्या सुमाराची होती. असे लक्षात येते. पेटारे नेणाऱ्या साथीदारांवर केवढी जबाबदारी होती! आपण काही विशेष वेगळे आज करतो आहोत असा किंचितही संशय पहारेकऱ्यांना अन् फुलादखानला येऊ नये , याची दक्षता या पेटारेवाल्यांनी किती घेतली असेल ? असा आम्हाला नाटका-सिनेमांत अभिनय तरी करून दाखवता येईल का ? ज्या क्षणी पेटारे शामियान्यातून आणि छावणीच्या परिसरातून बाहेर पडले असतील तेव्हा मावळ्यांना झालेला आनंद व्यक्त करण्याइतकीही सवड नव्हती.पेटारे निसटले.

अंधार दाटत गेला. नेमके महाराजांचे संबंधित पेटारे भट्टी पेटवून बसलेल्या कुंभाराच्या दिशेने धावत होते. याच दिशेने संबंधित मावळे घोडे घेऊन येत होते. महाराज ज्या क्षणी त्या पेटलेल्या भट्टीपाशी जाऊन पोहोचले असतील , त्याक्षणी त्या कुंभाराला काय वाटले असेल ? त्या जाळाच्या अधुऱ्या प्रकाशात या सगळ्या हालचाली , पसार होण्याची घाईगदीर् आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे दिसले असतील ? फक्त कल्पनाच करायची. इतिहास येथे थबकतो. कारण याचा तपशील कुणीच लिहून ठेवलेला अजून तरी सापडलेला नाही. हे आपल्या अभ्यासाने आणि प्रतिभेने कलावंतांनी सांगायचे आहे. चित्रकरांनी चितारायचे आहे कवींनी आणि गायकांनी गायचे आहे. अभिनेत्यांनी रंगमंचावर सादर करायचे आहे. शिल्पकारांनी शिल्पित करावयाचे आहे. केवढा विलक्षण इतिहास घडलाय हा! आमच्या मनांत एकच शंका डोकावते , की यातील एकही मावळा फितुर कसा झाला नाही ? जहागीर मिळाली असती ना औरंगजेबाकडून चंगळ करायला अमाप दौलत मिळाली असती ना , शाही खजिन्यातून.

असं काहीच घडलं नाही. कारण राष्ट्रीय चारित्र्य. या प्रकरणातील प्रत्येकजण हा ' नायक ' होता. कुंभारापर्यंत यात खलनायक एकही नव्हता.

नेताजी सुभाषचंद बोस हे ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन निसटले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते भारताबाहेर गेले. त्यांनी हिंदुकुश पर्वत ओलांडला. त्यांच्या डोळ्यापुढे ही आग्ऱ्याहून सुटकाच असेल काय ? आणि आमच्या तडाख्यातून हैदराबादचा लायकअली पसार झाला तेव्हा आमच्या डोळ्यापुढे फुलादखानचा वेंधळेपणा असेल काय ?

Comments

Popular posts from this blog

Battle of Sinhagad

Kondana fort, on the outskirts of Pune, was still under Mughal control. Uday Bhan Rathod, the fort keeper, led an army of about 1500 Rajputs and Mughals for the protection of the fort. On February 4, 1670 Shivaji deputed one of his most senior and trusted generals, Tanaji Malusare, to head a mission to capture Kondana. Tanaji Malusare surveyed the fort and its defenses for some days. The fort was extremely well guarded. One very sheer cliff caught Tanaji's eye. This side was least guarded as one could not possibly imagine climbing the fort from this steep side. Tanaji decided to scale this cliff to enter the fort. He used a monitor lizard(known as ghorpad in Marathi named "Yeshwanti" with a rope tied around its body for climbing this cliff on a moonless night.[citation needed] Perhaps this was the first time in the history of wars where a lizard was used to climb a fort.[citation needed] As the advance party reached the top, they threw ropes for others to climb. Meanwhile...

शिवरायांचा आठवावा साक्षेप

शिवराय हे धर्मनिरपेक्षतेचे नायकच नव्हे , तर महानायक होते. आज ते सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक बनायला हवे होते.पण , त्यांच्या राजवटीला धामिर्क परिमाण देऊन त्यांना ' मुस्लिमविरोधी हिंदूधर्मरक्षक ' बनवले जात आहे.आज देश कधी नव्हे एवढ्या धर्मचक्रव्यूहात सापडला आहे. धर्माच्या नावाने मत्सरभावना वाढीस लावल्या जात आहे. राजकीय सत्तेसाठी धूर्त मंडळी धर्माचा वापर करून दंगली करताहेत. आणि हे करताना ' शिवाजी महाराज की जय ' म्हणून घरांना आगी लावतात हे फारच क्लेशकारक आहे. शिवरायांला कट्टर धर्मश्ाद्ध ठरवून , त्यांच्या विचाराची मोडतोड करून समाजात विष पेरण्यात धूर्त मंडळी यशस्वी होत आहेत. शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्षतेचे नायकच नव्हे , तर महानायक होते. त्यांच्या राजवटीला धामिर्क परिमाण दिले जात आहे. ते मुस्लिमविरोधी व हिंदूधर्मरक्षक होते , असे सांगण्यात येत आहे. पण , शिवराय कधीही मुस्लिमविरोधी नव्हते. त्यांच्या पदरी , तेही मोठमोठ्या हुद्द्यांवर अनेक मुसलमान सरदार , वतनदार होते. त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान होता , आरमाराचा प्रमुख दर्यासारंग दौलत खान होता , अंग...

Introduction:-

Shivaji Shahaji Bhosle (Born:February 19, 1630, Died: April 3, 1680), commonly known as Chhatrapati Shivaji Maharaj (Marathi: छत्रपती शिवाजीराजे भोसले) was the founder of the Maratha Empire. Shivaji was younger of the two sons of Shahaji Bhosle and Jijabai. His father, Shahaji was a Maratha general who served at various occasions the Bijapur Sultanate, Deccan sultanates and the Mughals. Shivaji with his ideology of Hindavi Swaraj (freedom for Hindustan) decided to directly challenge Bijapur Sultanate rule and eventually the Mughal empire, to establish the Marāṭhā Sāmrājya or the Maratha Empire. Shivaji succeeded in establishing control of major portion of western India during his lifetime. . At its peak the Maratha Empire rule spread across most of the present day India. Shivaji’s ideology of Hindavi Swaraj and subsequent expansion of the Maratha Empire, was partly responsible for re-establisment of Hindu rule and its re-emergent assertiveness throughout the mainland of present day ...